आपली नूज : सतीश भवरे
दिनांक : 30/03/2022
भोकर ( प्रतिनिधी )
येथिल सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ( सिटू ) शी संलग्न असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिस, शालेय आहार कामगार, आशा गट प्रर्वतक, बांधकाम कामगार , किसान सभा, शेतमजूर , शासकीय निमशासकीय कर्मचारी हे केंद्रातील भाजप सरकारच्या कामगार, कर्मचारी, शेतकरी व जनता विरोधी धोरणे राबवून श्रमिक शोषण करीत असून त्या विरोधात केंद्रातील सरकारच्या निषेधार्थ दि. २८, २९ मार्च २०२२ रोजी दोन दिवस देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत.विविध मांगण्यांचे निवेदन भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांना आज दि. २८ मार्च २०२२रोज सोमवारी देण्यात आले. वरील विविध क्षेत्रातील कामगारांच्या मांगण्या पुढील प्रमाणे आहेत . कामगारांना गुलाम बनवून शोषण करणारे चार श्रमसिंहीता रद्द करा, सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन व सामाजिक सुरक्षा लागू करा, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय आहार कामगारांना व आशावर्कर्सना किमान वेतन २४०००रूपये लागू करुण त्यांना शासकीय सेवेत कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर ११हजार रू. मानधन दया व सेकाचा दर्जा दया, मनरेगा अंतर्गत मजूरांना वर्षातून २०० दिवस काम देऊन ६००रु मजूरी दया, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर सिटूचा प्रतिनिधी घ्या, केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकेवर लादलेले पोषण ट्रॅकर ऍप इंग्रजीतले मराठी भाषेत करा,पोषण ट्रॅकर ऍप भरण्यासाठी सक्ती करूण धमकावणाऱ्या व न्यायालयाचा अवमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा यासह अन्य मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी कॉ. शिवाजी गायकवाड, कॉ. दिलीप पोतरे, कॉ. अनिल कराळे, गंगाधर दागट, रेखा किसवे,के. जी. हस्सेवाड, अरूणा इनामदार, राजश्री चालीकवार , आशा वाघमारे, जयश्री रेखावार, तक्षशिला हिरे, रेखा नायके, वनिता पांचाळ, बेबी डवरे, वनिता तेले आदी कामगार कर्मचारी उपस्थित होते.