भोकर येथे पालक मेळाव्याणे पोषण पखवडा अभियानाची सांगता

 


आपली नूज : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

दिनांक. 07/04/2022


         शहरात एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प क्र. ३ नांदेड अंतर्गत मुख्य सेविका अर्चना शेट्टे यांच्या मार्गदर्शना खाली पोषण पखवडा अभियाणा द्वारे गेल्या पंधरा दिवसापासून विविध कार्यक्रम  राबविण्यात आले असून नुतन शाळा परीसरातील अंगणवाडी केंदात  पालक मेळावा घेऊन पालकांना गरोदर माता, स्तनदामाता, बालकांना , किशोरीना पुरक पोषण आहारा  व पाण्याचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन करुण पोषण पखवडा अभियानाची सांगता करण्यात आली.  अधिक माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यत दि. २१ मार्च २०२२पासून ते ०४ एप्रिल २०२२ पर्यंत पोषण पखवडा अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात आले असून पोषण मेळावा, जल व्यवस्थापण पाण्याचे महत्व, गृहभेटी, स्पर्धा, अॅनिमिया मुक्त भारत, गर्भवती महिला , किशोरी, स्तनदा माता, कुपोषित बालके समुपदेशन शिबीर, अरोग्य तपासणी, जनजागृती, पारंपारिक अन्न, निरोगी आई व बाळासाठी बाजरीचे महत्व  आदि कार्यक्रम एकात्मीक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प क्रं.३ नांदेड  अंतर्गत भोकर शहरातीलअंगणवाडी केंद्रा द्वारे सदरील अभिमान राबविन्यात आले . अभियानाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण व दिप प्रज्वलीत करुण पोषण पखवाडाचे उद्दघाटन केले.नुतन शाळा परिसरभोकर येथिल अंगणवाडी केंद्रात अॅनिमिया कॅम्प घेऊन ग्रामिण रुग्णालय भोकर येथिल कर्मचारी यांनी गरोदर माता, किशोरी यांची रक्त तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर अंगणवाडी केंद्र परिसरात सेविकांनी सतत १५ दिवस रोज २० कूटूंबांना गृहभेटी देऊन मर्गदर्शन केले आणि ०ते ६ वर्षे वयोगटातील मुला, मुलींचे वजन उंची घेण्यात आली , पवार कॉलनी अंगणवाडी केंद्रात पाककृतीचे आयोजन करूण गरोदर माता , स्तनदा माता, किशोरिना आहारा विषयी माहिती सांगून विविध प्रकारचे पोष्टीक आहारा बनवून वेगवेगळ्या प्रकारच्या आहाराचे महत्व त्यांना पठवून देण्यात  आले. त्याचबरोबर बाजारात जाऊन सेविकांनी बाजारात बाजार हाट्ट करणाऱ्यांना भाजीपाला फळे यांच्या पोष्टीकते विषयी जनजागृती केली. वार्डा वार्डात पोषण पखवाडा आभियान अंतर्गत सायकल पोषण रॅलीचे आयोजन करूण पाण्याचे महत्व व पोषण आहाराचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. शेवटी पालक मेळावा आयोजित करूण पोषण पखवडा अभियानाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी भोकर शहरातील अंगणवाडी सेविका अरुणा इनामदार , राजश्री चालीकवार, आशा वाघमारे, नफीस शेख नजीर, तक्षशिला हिरे,ललीता ताटे, जयश्री रेखावार, कौशल्या बिजमवार, नर्तावार, मदतनिस मालनबाई जाधव, अरूणा वैष्णव, संजिवनी पांचाळ, द्रोपदाबाई राजरपल्ले , कात्रेबाई,मिनाक्षी पोलावार, शोभा तगडपल्लेवार यासह शहरातील अन्य सेविका, मदतनीस यांनी सदरील आभियान सतत १५ दिवस यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने