पौर्णिमेनिमित्त भोकर तालुक्यात विविध ठिकाणी धम्म प्रवचन व वंदनेचा कार्यक्रम.



आपली नूज : सतीश भवरे

मोबाईल : 8446273667

भोकर ( नांदेड )



    भोकर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गाव तिथे शाखा घर तिथे समता सैनिक दल या उद्देशाने तालुक्यातील अनेक गावात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा तयार करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विहारांमध्ये दर रविवारी वंदने चा कार्यक्रम खेड्यामध्ये नित्य नियमाने होत आहे.आणि पौर्णिमेच्या निमित्तानेही सर्व ग्रामस्थ विहारांमध्ये येऊन पौर्णिमेचे महत्त्व साधून,सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करताना दिसून येत आहेत. दिनांक 17 मार्च 2022 रोजी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहारात जाऊन बोध उपासकांनी या पौर्णिमेनिमित्त वंदना चा कार्यक्रम घेतलेला आहे.यासाठी तालुक्याच्या वतीने काही गावांना भेटी देण्यात आलेल्या होत्या.त्यामध्ये नुकतीच नव्याने आणि पहिल्यांदाच ग्राम शाखा स्थापन केलेल्या मौजे भरभुशी येथे पौर्णिमेनिमित्त खीर व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव आप्पारावजी येरेकर सर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस बी.पी. सोनकांबळे सर तालुका कोषाध्यक्ष प्रसाद शहाणे तेलंगणा राज्याचे कुबेर मंडलाचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राहुल एडके भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण सचिव किशोरजी सोनुले संघटक सूर्य मोहन जगमे त्याचबरोबर समता सैनिक दलाचे राजीव दांडगे हे यावेळी उपस्थित होते.पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम शाखेच्या अध्यक्षा आयु.आम्रपाली नागभूषण गायकवाड यांनी भूषविले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा सन्मान करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी बौद्ध धम्मामध्ये वर्षातील प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व गौतम बुद्धाच्या जीवनातील ठळक घडामोडीवर दृष्टी ठेवून आजच्या या पौर्णिमेचा अर्थात फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व उपस्थित सर्व ग्रामवास यांना पटवून दिलेले आहे.यावेळी गावातील बौद्ध उपासक उपासिका बालक व इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रम सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष आयु गोविंद गायकवाड यांनी केले तर आभार भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा सरचिटणीस विलास सावळे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर रात्री ८:३०वाजता सर्व पदाधिकारी किनी येथे सुरू असलेल्या वंदनेच्या कार्यक्रमांमध्ये सामील झाले या ही ठिकाणी सर्व बौध्द उपासक उपाशीका यांच्यासमवेत तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होऊन फाल्गुन पौर्णिमेनिमित्त विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी किनी येथील ग्राम शाखेचे सरचिटणीस आयु.दिलीप हेमले,धम्मपाल कांबळे,व इतर गावातील बौध्द उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल कांबळे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन रसाळे बंधू यांनी केले शेवटी सरणतय गाथे नंतर हा कार्यक्रम संपवण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने