बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचे उप. विभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांचे आश्वासन.
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल :८४४६२७३६६७
भोकर (नांदेड )
भोकर शहरातील महामानव डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेवरील अतीक्रमन शासन व प्रशासन यांना अनेक वेळा निवेदने देऊनही हटविन्यात येत नसल्यामुळे आज दि.12/04/2022 रोजी भिम टायगर सेनेच्या वतीने भिम टायगर सेनेचे राष्र्टीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या आदेशानुसार नारवाट तलावामध्ये भिम टायगर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये जल समाधी अंदोलन करन्यात आले.यावेळी भिम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुलदादा सोनकांबळे,जिल्हा युवा अध्यक्ष अशितदादा सोनुले,भोकर तालुका अध्यक्ष प्रतिकदादा कदम,तालुका उपाध्यक्ष भिमरावदादा हनवते,टॅक्सी चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवदादा डोंगरे,अॅटो युनियन तालुका अध्यक्ष शेख इम्रान,भोकर शहराध्यक्ष विजय उर्फ पिल्ली दवने,कबीर जंगले राहटी,सम्यक सोनुले देवठाना,यांच्यासह असंख्य भिम टायगरांनी या अंदोलनात सहभाग घेतला होता.शेवटी भोकर उपविभागिय अधिकारी मा.राजेंद्र खंदारे साहेब यांच्या लेखी अश्र्वासना नुसार हे अंदोलन मागे घेन्यात आले.पण जोपर्यंत त्या जागेवरील अतीक्रमण हटनार नाही तोपर्यंत हा लढा सतत चालुच राहील.