भोकरची राणी झलकारी ९३.६० टक्के गुण प्राप्त करूण एस.एस.सी. मध्ये उत्तीर्ण . सर्वत्र कौतुक, अभिनंदन.


आपली नूज :

भोकर ( नांदेड

दिनांक.18/06/2022

       


             


भोकर ( प्रतिनिधी ) येथिल राणी झलकारी रमेश गायकवाड हीने एस.एस.सी . बोर्ड परिक्षेत ९३.६० टक्के गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.                                      अधिक माहिती आशी की, भोकर येथिल राणी झलकारी ही, कोकण विभागातील रत्नागिरी जिल्हयातील खेड तालूक्यात एल.टी.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल खेड येथे एस.एस.सी. ची परिक्षा देऊन घवघवीत यश प्राप्त करूण शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिने कुठेही क्लासेस न करता स्वतःच्या बळावर आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्द व चिकाटीने मेहनत घेऊन सदरील १०वी परिक्षेत यश प्राप्त केल्यामुळे एल. टी. टी. इंग्लिश मिडियम स्कूल खेड चे  मुख्याध्यापक जि. बि. सारंग, सहशिक्षक जॉय सबिस्टीयन सर व सर्व शिक्षक स्टाफ , आई वडील प्रतिभा रमेश गायकवाड व त्याचबरोबर भोकर तालूक्यातील तिचे अजोबा गोपाळराव गायकवाड, नांदेडचे आंबेडकरी चळवळीचे क्रांतिकारी जेष्ट नेते  सुरेशदादा गायकवाड , समाजभूषण जेष्ट पत्रकार एल.ए. हिरे, काका काकू तक्षशिला शिवाजी गायकवाड भाऊ बहिणीं, पत्रकार जय भिम पाटील , सुभाष तेले , राजू मामा, कॉम्रेड दिलीप पोतरे, अॅड. सिध्दार्थ कदम , तेलंगांना प्रदेशातील मामा मामी त्रिशला अनिल सोनटक्के  यासह खेड व भोकर परिसरातील अप्तेष्टांनी भरभरूण कौतूक करुन  अभिनंदनाचा वर्षाव केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने