स्वाधार शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवा - भिमराव बुक्‍तरे



आपली नूज : सतीश भवरे

मोबाईल : ८४४६२७३६६७

भोकर ( नांदेड )

     नांदेड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत विविध समस्यांना तोंड  देणारे विद्यार्थ्याचे होणारी तारांबळ थांबवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अपात्र ठरविण्यात आलेल्या, पात्र किंवा अपात्र यादीत नाव नसलेले विद्यार्थी, थेट द्वितीय वर्षाला लाभ देता येत नाही. स्वाधार योजनेची रक्कम तात्काळ जमा करा, कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनाचा लाभ मिळावा त्रुटी राहिल्या, अशा विविध प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे गरीब, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे वंचित राहू शकतात करिता आपण विषयावर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांना देण्यात आले.

     अन्यथा सर्व विद्यार्थ्यांना घेवून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी उपस्थित  बहुजन युथ पँथर चे जिल्हा प्रभारी भिमराव बुक्तरे, सामाजिक कार्यकर्ते विकास राठोड पोमनाळकर,श्रावण पवार , गौरव बुक्तरे, नागेश लोकडे, नंदपाल सावंत, बाबासाहेब निवडंगे, राष्ट्रपाल सावंत, रौनक लोकडे, शंतनु वैद्य आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel