थेरबन येथील चार विध्यार्थ्यांनी प्रथमच NMMS परीक्षेत उत्तीर्ण होऊन रचला इतिहास

आपली नूज : सतीश भवरे
भोकर ( नांदेड )
दिनांक : 12 आगस्ट 2022

        आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती  परीक्षा 2021-22चा निकला नुकताच लागला असुन जि प प्रा शाळा थेरबन शाळेतील चार हिरे चमकले आणि इ. आठवीत NMMS परीक्षा देऊन शिष्यवृत्तीस पात्र होऊन त्यांनी प्रथमच गावात यशाचा इतिहास रचला.

1) कु. प्रिया गणेश मुपडे
2) कु. अंकिता गोविंद मलदोडे
3) कु. गणेश मुरलीधर शिंदे
4) कु. सुनिल कोंडीबा मुसळे

 या विध्यार्थीनी यश संपादन केले आहे.


     
ग्रामीण भागातुन एका शाळेतुन चार विध्यार्थी NMMS शिष्यवृत्तीस पात्र होणे म्हणजे सोपी गोष्ट नाही यामध्ये पालकांचे आणि मुख्याध्यापक यांचे सहकार्य व शिक्षकांचे सतत मार्गदर्शन लाभले, त्यांना मार्गदर्शन करणारे गुरू श्री. हुलसुरे के. एच. व श्री.मुंडकर जी.बी.यांनी गेली 2 वर्ष या साठी कठीण मेहनत घेतली व विद्यार्थ्यांचा पाय पक्का करणे,त्यांच्यात अभ्यासबद्दल आवड निर्माण करून,स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी,तज्ञमार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करू  देणे,उन्हाळी सुट्टी मे2022 मध्येही निरंतर ऑनलाईन तासिका,उन्हाळी अभ्यासिका,रात्र शाळा आशा माध्यमातून व  वेळोवेळी 53 सरावसंच सोडवून घेणे सोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेली अथक परिश्रमाची चिकाटी ,जिद्द कायम राखणे या सर्व गोष्टींमुळे आज शाळेचे मु.अ. श्री. वटमवार सर, वर्गशिक्षक श्री. हुलसुरे सर ,मार्गदर्शक- श्री.मुंडकर सर यांची मेहनत सार्थ झाली, या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून पालकांच्या व सबंध 
थेरबनवासीयांच्या अपेक्षा पुर्ण केल्या आणि यश प्राप्त केले..!! 

         शा. व्य. स. मा. अध्यक्ष श्री. विठ्ठलराव जाधव साहेब यांनी गावातीलच प्रा. गणपत शेळके, प्रा. पंडीत हाके, प्रा. पंकज हाके, अमोल हाके, संतोष वाघमोडे, परमेश्वर बतलवाड, तेजस मलदोडे, महेश जाधव, आर्यन वाघमोडे, प्रफुल चव्हाण व पालक यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी रात्रीची शाळा हा उपक्रम यशस्वी केला. सोबतच NMMS परीक्षेच्या तयारीसाठी विठ्ठलराव जाधव यांनी उन्हाळी सुट्टीत स्वतःच्या घरी या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करून स्वतःचा स्मार्ट टि व्ही उपलब्ध करून दिला. त्यांचे हे विद्यार्थ्यांविकासाप्रती शैक्षणिक योगदान बहुमोल ठरले.

      ग्रामीण भागातील,शेतकरी,मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना शून्यातून  स्पर्धापरिक्षेत यश संपादन करण्यापर्यंत तयार करणे ही खूप मोठी व अद्वितीय बाब आहे..शाळेच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून आज कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने