काल दि 25/8/2022 रोजी भोकर येथे भिम टायगर सेनेच्या वतीने राजस्थान मध्ये जालोर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ व बौद्ध, मुस्लिम व मागासवर्गीय जनतेवरील अन्याय, अत्याचार विरोधात व न्याय व संरक्षण मिळावे याकरिता तीव्र आंदोलन छेडण्यात आले असता भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी विचार व्यक्त केले व अनेक मागण्या केल्या. सदर आंदोलन डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे झाले.
नांदेड जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई वाठोरे, MIM जिल्हाध्यक्ष बाबा खान, जिल्हासंपर्क प्रमुख राहुलदादा सोनकांबळे, आदींनी विचार व्यक्त केले. पिंटूभाऊ लोकरे, कपिल भाऊ भालेराव, करण भाऊ पंडित,युवा जिल्हाध्यक्ष जब्बार पटेल, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रेम दादा गायकवाड,मनोज दादा आंबेगावकर,मुदखेड तालुकाध्यक्ष कपिल दादा सोनटके, उपाध्यक्ष संतोष भाऊ कांबळे,हदगांव तालुका अध्यक्ष जयकीन दादा रावळे, भिम टायगर विध्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विशाल दादा भालेराव,उमरी शहराध्यक्ष आर्यन दादा लांडगे,भोकर तालुकाध्यक्ष प्रतीकदादा कदम, उप तालुकाध्यक्ष भीमराव दादा हनवते, शहराध्यक्ष शेख माजित,बेंद्रीचे कांबळे काका,चालक मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव डोंगरे, ऑटो यूनियन तालुका अध्यक्ष शेख इम्रान, प्रमोद जंगलेकर, कबीर जंगलेकर व राहठी येथील सर्व टायगर, सम्यक सोनुले, प्रशांत धमसे,इळेगाव चे शाखा अध्यक्ष रवीभाऊ खंदारे, संजय खंदारे,खंदारे नामदेव व शेख सोहेल, विशाल कांबळे,चंदू पाटील, भीमराव मस्के, योगेश गोरे, मुकिंद गोरले,रत्नदीप कदम चिकाळकर, पत्रकार अहेमद भाई करखेलीकर, सिद्धार्थ जाधव, सतीश भवरे, विजय मोरे सर्व जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक भोकर अध्यक्ष प्रतीक कदम यांनी केले. या आंदोलन कार्यक्रम साठी भोकर शहर व तालुक्यातील भिम टायगर आवर्जून उपस्थित होते.