डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी


आपली नूज : सतीश भवरे 

भोकर(प्रतिनिधी)

दिनांक : 23/08/2022

                महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये धर्मांध सनातन प्रवर्तीच्या शक्तीकडून निर्घृण खून करण्यात आला त्या आरोपींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी भोकर ता.अंनिसच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदना द्वारे केली आहे.

दि.२३आँगस्ट रोजी तहसीलदार भोकर यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले की अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या घटनेला नऊ वर्षे होत आहेत प्रतिगामी शक्तीचा दाभोळकरांच्या कार्याला विरोध होता म्हणूनच त्यांचा खुन करण्यात आला.त्यांच्या पश्चात ही विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य निर्भिड पणे चालू ठेवले आहे.

डॉ.दाभोळकर यांच्या खुना नंतर काँ.गोविंद पानसरे,डॉ.कलबुर्गी गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचे देखील खुंन केल्या गेले या चारही खुनातील आरोपीचा परस्पर संबंध देखील तपासातून पुढे येत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या चारही खुनाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना खदखदत आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपल्याद्वारे केंद्र व राज्य सरकारकडे पुढीलल मागण्या करीत आहोत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध लावावा.खुनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करावी.हा खुन खटला जलदगतीने चालवून आरोपींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर भोकर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ता.अध्यक्ष एल.ए.हिरे,मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष बी.आर.पांचाळ,अंनिचे सचिव दिलीप पोतरे,कार्याध्यक्ष शिवाजी गायकवाड, म.राष्ट्रीय काँग्रेस परिवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कोळी,पत्रकार शंकर कदम,सतिष भवरे आदिच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने