हदगाव :- प्नतिनीधी।
गौतम वाठोरे
भारत स्वतंत्र्याचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन हदगाव येथील पोलीस निरीक्षक श्री हनुमंत गायकवाड यांच्या पुढाकाराने अंबाळा गावचे पोलीस पाटील सुभाष पवार.परमेश्वर वाकोडे.यांनी १५ ऑगस्ट सोमवार रोजी भव्य रकदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ५७५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जपली हदगाव पोलीस प्रशासनाचे वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जनजागरण करून पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याकरिता जनतेस आव्हान केले होते आयोजित रक्तदान शिबिरात माननीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर माजी खासदार सुभाष वानखेडे, बाबुराव पाटील कोळेकर,आत्माराम पाटील जाधव.प्रल्हाद पाटील हडसनीकर.दिलीपराव चव्हाण.डॉ. संजय पवार.अमित अडसूळ. सीताराम कदम.नागोराव सूर्यवंशी. गजानन शिंदे.उपविभागीय अधिकारी श्री ब्रिजेश पाटील, तहसीलदार श्री जीवराज डापकर, नगर परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी दामोदर जाधव यांचे उपस्थितीत पोलीस प्रशासन व जिजाऊ ब्लड बँक नांदेड यांचे संयुक्त रित्या आयोजित शिबिर यशस्वीरित्या पार पडले रक्तदान शिबिरात एकूण ५७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता पोलीस स्टेशन हदगाव येथील सपोनि पांढरे , भोसले , पोलीस उपनिरीक्षक नासरे, गायकवाड,मोरे, चोपडे, संगीता कदम पोलीस हेडकॉन्स्टेबल नरवाडे, हंबर्डे, सातपुते पोलीस कॉन्स्टेबल पांचाळ केंद्रे गायकवाड पाईकराव तुपेकर पठाण वाडकर बट्टेवार जाधव होमगार्ड गणेश गिरबीडे शिवाजी पवार यांनी अथक परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले.