भोकर (सतीश भवरे )
आपली नूज
दिनांक : 16/08/2022
भारतीय स्वातंत्र्याला आज 75 वर्ष उलटली असल्याने केंद्र शासनाच्या आदेशाने संपुर्ण देश स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे स्वातंञ्यवीर ज्यांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या जुल्मी राजवटीतून मुक्त केले त्यांच्या बलीदाना मुळेच आपन आज आनंदाने राहत आहोत प्रगती चे शिखर पार करत आहोत विद्यार्थ्यानीही स्वातंञ्यावीराचे विचार आत्मसात करून यशस्वी होऊन देश सेवा करावी असे अवाहन पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी केले.
दि १५आॅगस्ट भारतीय स्वातंत्राच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त "हर घर तिरंगा उपक्रम देशभक्तांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरावर तिरंगा फडकावत तिरंगा ध्वजाला सलामी दिली विविध शासकीय शाळेत व तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला शहरातील प्रसिद्ध स्काॅलर्स इंग्लिश स्कूल अॅड ज्युनियर काॅलेज येथे स्वातंत्र्य दिवसाच्या अमृत महोत्स निमित्त भोकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उत्तम बाबळे. श्री सुधांशु कांबळे सर. कार्याध्यक्ष लतीफ शेख. तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव .उपाध्यक्ष आर के कदम . कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे. कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,विशाल जाधव, गजानन गाडेकर,बोईवार यांच्या प्रमुख उपस्तिथीत भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वतंत्र वीरांची वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्यवीर संबंधी माहिती उपस्थित मान्यवरांना पालकांना दिली.
या प्रसंगी पुढे बोलतांना पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले तुमच्या आईवडिलांची इच्छा असते माझा मुलगा मुलगी शिकावं मोठे होऊन देशाचं राज्याचं आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावं तुम्ही तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे तुम्ही या भारत देशाचे भविष्य आहात तुमच्यासमोर कितीही कठीण प्रसंग आले तरीही आपले शिक्षण पूर्ण करून एक मोठे अधिकारी व्हा असे म्हत्वपुर्ण मार्गदर्शन पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केलं यावेळी पालकांसह स्थानिक रहिवाश्यांची उपस्तिथी होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कॉलर्स इंग्लिश स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेजचे म.ईलीयास सर.रेहान सरवरी.ईरफान सरवरी म. सुजाओद्दीन यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.