रशियात अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव: भोकर मध्ये आनंदोत्सव साजरा

आपली नूज : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

    भोकर( तालुका प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा महान गौरव म्हणून मास्को मध्ये अण्णाभाऊंचा पुतळा तैलचित्र उभारण्यात आले ह्या गौरवाचा आनंदोत्सव भोकर मध्ये साजरा करण्यात आला.

     भोकर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि. 15 सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयोजक बालाजी वाघमारे, अनिल डोईफोडे, श्याम वाघमारे, सखाराम वाघमारे, दिलीप वाघमारे, राहुल शेळके, के. वाय. देव कांबळे आदींनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले शाहीर माधव वाघमारे आणि संचाचा बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर झाला, शाहीर बाबुराव गाडेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर शेर शायरीतून प्रभावी गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी माहूरकर अण्णा, गणपत पिटेवाड, उत्तम बाबळे, नामदेव वाघमारे, पूजा बनसोडे, अहमद भाई करखेली कर, संजय बरकमकर, यशोदाबाई शेळके, सौ. वंदना डोईफोडे, सौ.सुनीता डोईफोडे, आदींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले, फटाक्यांचे आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार अनिल डोईफोडे यांनी केले तर आभार बालाजी वाघमारे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने