शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावावर कमी पटसंख्या असणा­या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेणे बाबत भिम टायगर विद्यार्थी सेनेचे निवेदन



आपली न्‍युज,

हदगांव प्रतिनिधी.

   शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावावर कमी पटसंख्या असणा­या शाळा बंद करण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने मागे घ्यावा. कमी पटसंख्याच्या शाळा सरकट बंद करणे ही गरीब वर्गातून येणा­या विद्यार्थ्‍याचा शिक्षणाचा मुलभुत हक्क हिरावून घेण्यासारखे होईल. मुळातच कमी पटसंख्या असलेल्या बहुतांश शाळा राज्याच्या अशा दुर्गम भागात आहेत जिथे वाहतुकीची सोय कमी आहे. अशा शाळा बंद केल्यास विविध प्रश्न निर्माण होतील. अनेक गोरगरीब, आदिवासी वंचित वर्गातील विद्यार्थी वंचित राहतील.

    शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मुलभुत अधिकार आहे.वाड्या,वस्त्यावरच्या,तांड्यावरच्‍या शेवटच्या मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहचवणे हे शासनाचे बंधनकारक कर्तव्य आहे.तात्काळ शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा भिम टायगर विद्यार्थी सेनेच्या वतीने नांदेड जिल्हाभर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.अशा प्रकारचे निवेदन तहसिलदार,हदगांव यांच्‍या मार्फत शिक्षणमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांना देण्‍यात आले.सदरिल निवेदनावर विशाल भालेराव विद्यार्थीसेना जिल्‍हाध्‍यक्ष,विशाल पाईकराव,विशाल सोळंके,अक्षक कांबळे,माधव सावतकर,आकाश सावते इत्‍यादींच्‍या स्‍वाक्षर्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने