भोकर डॉ. कैलास कानिंदे
नांदेड जिल्हात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी विशेष समर्पणाची गरज असून, त्यासाठी आतापासूनच प्रत्येकाने तन,मन आणि धन झोकून देण्याची गरज आहे लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही होऊ शकतात,अशी शक्यता असुन बसपा कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी एकत्र येण्यास बसपा महाराष्ट्र प्रभारी मनिष कावळे यांनी आरक्षण हक्क परिषद व समीक्षा बैठकीत संगम फक्शनं हॉल भोकर येथे बोलताना म्हणाले.
या वेळी सर्व प्रथम महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रम घेण्यात आला पुढे बोलताना कावळे म्हणाले कि बसपा हा राष्ट्रीय पक्ष असून काँग्रेस व बीजेपी ला टक्कर देणारा पक्ष असून मायावती ह्याच एस.सी.एस. टी.ओबीसी साहित सर्वांचे हित करावयाचे असेल तर बहन मायावती यांना मतदानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री करावे असे शेवटी आवाहन करण्यात आले आहे या नंतर सिंग बोलताना म्हणाले कि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विधान सभा क्षेत्रात बसपा चे संघटन वाढवुन घेण्यासाठी आयोजित आरक्षण हक्क परिषद व समीक्षा बैठक कार्यकत्याची भोकर येथील संगम फंक्शन हॉल येथे घेण्यात आली बसपा चे सिंग यांनी बुधवारी भोकर विधान सभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले असून, विधान सभेत आतापर्यंत पक्षाची ताकद बनायला हवी होती पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघ निहाय पक्षाचा आढावा घेत बसपा चे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंग ,यांनी भोकर विधान सभा मतदार संघातील आयोजित आरक्षण हक्क परिषद व समीक्षा बैठकी दरम्यान बोलत होते यावेळी बसपा चे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंग ,बसपा चे महाराष्ट्र प्रभारी मनिष कावळे , प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने , भीमशाहीर साहेबराव येरेकर , परमेश्वर गोणारे (ब.स.पा. प्रदेश महासचिव महाराष्ट्र ), दिगांबर ढोले प्रदेश महासचिव ), राहुल कोकरे प्रदेश सचिव ), भिमशाहीर साहेबराव येरेकार (राष्ट्रीय प्रबोधनकार ), प्रा.डॉ. आनंद भालेराव (नांदेड झोन प्रभारी तथा हिंगोली लोकसभा संघटक ), दिलीप देशमुख (नांदेड झोन प्रभारी ),
लक्ष्मण वायवळे (जिल्हा अध्यक्ष ), साहेबराव डाकोरे (जिल्हा अध्यक्ष ), वंदना गव्हाणे (जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ), सुनिल डोंगरे (जिल्हा प्रभारी ), बळीराम निखाते (नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष ), साहेबराव थोरात ( जिल्हा प्रभारी ), गणेश राऊत (जिल्हा महासचिव ), डॉ. कैलास कानिंदे (जिल्हा सचिव ), सखाराम इंगोले ( संघटन मंत्री ), निखील हंकारे (भोकर विधानसभा अध्यक्ष ), पंचशिलाबाई जाधव (भोकर विधानसभा अध्यक्ष महिला आघाडी ), सतिश भवरे (तालुका प्रभारी ),सुगत कसबे (शहर अध्यक्ष ), चंद्रकांत स्वामी (शहर उपाध्यक्ष ), संजय बाभळे (तालुका युवा अध्यक्ष ), प्रफूल जाधव ( तालुका उपाध्यक्ष ) केशव बाभळे (वडार भाईचारा तालुका अध्यक्ष ), जगदीश पपूलवाड (गोल्ला - गोलेवार भाईचारा तालुका प्रभारी ), गुरूप्रसाद कारलवाड (गोल्ला -गोलेवार भाईचारा तालुका अध्यक्ष ), बालाजी जाधव ( मराठा भाईचारा तालुका अध्यक्ष ), श्रीधर जाधव (सामाजिक कार्यकर्ते ), संभाजी चेरकेवाड (सामाजिक कार्यकर्ते ) गणपत कानिंदे (सामाजिक कार्यकर्ते ), धम्मपाल हनवते ( सेक्टर अध्यक्ष दिवशी ), खंडू सुंकळीकर ( सेक्टर अध्यक्ष कोळगाव ), सिद्धार्थ कानिंदे, विश्वजीत दादा कानिंदे , साहेबराव मुनेश्वर, रामराव भगत, नरेश शिंगूरवाड, गंगाधर गोरे , ममता बोटलेवाड , आम्रपाली घोडे, यशोदाबाई घोडे, बेबीता घोडे, भारत बाई घोडे, जिजाबाई भुकतरे, पुष्पाबाई घोडे, तसेच सिध्देश्वर पिटलेवाड (ता.अध्यक्ष भोकर आदिवासी कोळी महादेव जमात ), माधवराव बोईनवाड ता.संघटक भोकर (उपसरपंच मातुळ), पुंजरवाड साहेब आदिवासी कोळी भाईचारा सल्लागार, साईनाथ याट्टेवाड माजी सरपंच हळदा ,लक्ष्मण मदेवाड, माधव बोंबलणार, ममता बोटलेवाड ,मारोती कोंगेवाड ,सदाशिव गोणेवाड व इतर बहुसंख्या पदाधिकारी व कार्येकते व हिंतचिंतक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम सूत्रसंचालन पत्रकार तथा तालुका प्रभारी सतीश भवरे व आभार जिल्हा सचिव डॉ. कैलास कानिंदे यांनी मानले.