मांडवी गावाचे निर्माता बळीराम पाटील यांचे अद्वितीय सामाजिक कार्य

श्रीक्षत्र माहूर 

     मांडवी गावाचे निर्माता बळीराम पाटील यांच्या सामाजिक कार्याचा ठसा आजही गावाच्या विविध संस्थांमध्ये उमटतो. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या पैशांतून सर्वोदय बोर्डिंग ची स्थापना केली, जेथे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. तसेच, ज्ञानप्रसारासाठी त्यांनी हिरा वाचनालय उभारले. आज सर्वोदय बोर्डिंगला शासनाचे अनुदान प्राप्त झालेले आहे.

     त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ वाचनालयाला सरदार वल्लभभाई पटेल भुवन असे नाव दिले. या वाचनालयाच्या कोनशीलेचे उद्घाटन १९ ऑक्टोबर १९५५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी इ. व्ही. रामरेड्डी यांच्या हस्ते झाले.

     काळाच्या ओघात वाचकांचा प्रतिसाद कमी झाल्याने हे ग्रंथालय ओस पडले. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत सध्या सरस विद्यालयाचा (LKG विभाग) उपक्रम सुरू आहे. त्या काळच्या उत्तम बांधकामाचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.अशी भावना बळीराम पाटील यांचे नातू तथा बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने