संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
आपली न्युज
दि.27/11/2021
नांदेड : ऑल इंडिया पँथर सेना आयोजित संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात छत्रपती चौक याठिकाणी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर लगेचच संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.विकास कदम हे होते. त्यांनी उद्घाटनपर भाषणात संविधानावर प्रकाश टाकला.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमराव बुक्तरे यांनी केले. तर प्रमुख वक्ते म्हणून राहुल पवार ( बुलढाणा ) हे होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व महापुरुषांच्या विचाराचा ठेवा म्हणजे भारतीय संविधान आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गणेश जोशी,ऍड.विजय गोणारकर हे होते.
जोशी पुढे बोलताना म्हणले की, संविधान कोण्या एका जाती किंवा धर्मासाठी नसून ते पूर्ण भारतीयांसाठी आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माधवदादा जमदाडे , मनीष कावळे, डॉ. विठ्ठल पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजू सोनसळे, अक्षय जोंधळे, वैभव गायकवाड, अशोक वायवळे, दिनेश लोणे ,प्रा राज गायकवाड, डॉ. प्रविणकुमार सेलूकर, प्रा.राहुल पुंडगे ,अनिल शिरसे, मधुकर झगडे, राहुल चिखलीकर, संदीप मांजरमकर,अनिल गायकवाड, अंकुश सावते, रमेश लोखंडे, आकाश सूर्यवंशी,कुणाल सावते, निखिल गर्जे, संजय बुक्तरे व आदी संविधान प्रेमी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हिंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले होते.