भोकर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

भोकर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न


आपली न्युज: सतीश भवरे

दि.29/11/2021

     दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास उपस्थित म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र सचिव तथा केंद्रीय शिक्षक आयु.संबोधी सोनकांबळे सर, यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. प्राचार्य पी.एम.तोडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक आयु.युवराज मोरे सर,जिल्हा सरचिटणीस आयु.रविकिरण जोंधळे सर,जिल्हा संस्कार सचिव सुभाष नरवाडे,आयु. प्रा. अप्पाराव येरेकार सर,शहर शाखेचे अध्यक्ष आयु. साहेबराव मोरे हे या वेळी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आयु.गोविंदराव गायकवाड यांच्याकडून उपस्थितांना त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.त द्नंतर सर्व मान्यवरासहित उपस्थित पदाधिकाऱ्यांचे तालुका शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका शाखेने निवड केलेल्या 23 ग्राम , शहर व वार्ड शाखेचे पदाधिकारी या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात केंद्रीय शिक्षकांकडून भारतीय बौद्ध महासभेची स्थापना,संस्थेची रचना,ध्येय,धोरण,उद्दिष्ट,समस्या,अडचणी व उपाय आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या विषयावर सखोलपणे मार्गदर्शन दिवसभरात टप्प्याटप्प्याने करण्यात आले यावेळी या प्रशिक्षण शिबिरास शहर व ग्रामीण भागातील संस्थेचे पदाधिकारी 200 हून अधिक उपासक-उपासिका उपस्थित होते.त्यांना शाखेच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सर्व पदाधिकाऱ्यांना आयु.उद्योजक तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस दत्ताभाऊ डोंगरे यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रशिक्षण शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे पर्यटन उपाध्यक्ष आयु.सी.एम.कदम,महिला उपाध्यक्ष आयु. नि. कविता डोंगरे,संस्कार सचिव आयु.रमेश रावळे,पर्यटन सचिव चंद्रकांत चव्हाण,संजय गुंडेराव,संरक्षण सचिव किशोर सोनुले,कार्यालयीन सचिव आयु.यु.एन.एडके सर, संघटक आनंदराव कदम,सूर्यमोहन जंगमे,गणपतराव गोंवदे, माधवराव लोखंडे,यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका शाखेचे सरचिटणीस आयु.बी.पी.सोनकांबळे सर यांनी केले तर शेवटी शाखेचे कोषाध्यक्ष प्रसाद शहाणे यांनी सर्वांचे आभार मानले.सरणतय गाथेनंतर हा कार्यक्रम संपविण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने