वर्ल्ड व्हिजन संस्थेने दिव्यांग कुटुंबांना दिलेली मदत कौतुकास्पद आहे.
आपली नूज : सतीश भवरे
मोबाईल : 8446273667
भोकर ( नांदेड )
वर्ल्ड व्हिजन इंडिया भोकर प्रकल्पातर्फे दि. ८ मार्च २०२२ रोजी १४ गावातील ३० दिव्यांग कुटुंबांना शेळ्या वाटप करण्यात आल्या . शेळ्या वाटप वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू यांच्या हस्ते करण्यात आले . एका कुटुंबाला २० हजार रुपये प्रमाणे ३ते४ शेळ्या प्रत्येकी मिळाल्या .दिव्यांग हे अती गरिब असल्याने कुटुंब चालविणे कठीण होते. या मदतीने नवीन आशेच्या किरणांचा उदय दिव्यांगाच्या आयुष्यात झाला आहे . मागील महिन्यात तालुक्यास्तरीय दिव्यांग संघटन स्थापन करण्यात आले . त्यामध्ये दिव्यांगानी संघटित होऊन शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी व आरोग्य सुविधेचा लाभ कसा घेता येईल यावर प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू यांनी मार्गदर्शन केले. या शेळ्या वाटपाच्या कार्यक्रमात आमदरी , बेंबर देवठाणा , देवठाणा तांडा , धानोरा , जांभळी रेणापूर , कोळगाव बु. , लामकाणी , मोघाळी , नारवट , रेणापूर व सावरगाव माळ या १४ गावातील दिव्यागांना शेळ्या वाटप करण्यात आल्या. या शेळ्या मुळे कुटुंबांना एक नवीन दिशा मिळाली आहे. वर्ल्ड व्हिजन या संस्थेने लहान मुले आणि वृद्धांसाठी एक संघटन तयार करण्यास मदत केली होती. या संघटनच्या माध्यमातून वर्ल्ड व्हिजन त्यांच्या जीवनात टिकून राहण्यासाठी मदत करत आहे.हा कार्यक्रम भोकर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बिबिचन जाधव यांनीही सादर केला. शेळ्या वाटप करताना प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू , वर्ल्ड व्हिजन इंडियाचे रतीलाल वळवी , प्रकाश फुलझेले , स्टेला असांगी इत्यादी उपस्थित होते .