आपली नूज : सतीश भवरे
दिनांक : 14 आगस्ट 2022
भोकर (तालुका प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाळणीच्या वेळी अनेक कुटुंबे विस्थापित झाली होती, अनेकांच्या हालअपेष्टा झाल्या होत्या, 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृतिदिन म्हणून पाळल्या जातो, भोकर तहसील कार्यालयात फाळणी दिवसानिमित्त, अनेक दुःखद आठवणींना उजाळा देणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.
फाळणी नंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले त्याकाळी काय परिस्थिती होती लोकांचे हाल कसे झाले अत्यंत दुःखद परिस्थिती निर्माण झालेली होती हे सर्व दाखवणारे चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली नगरपरिषद भोकर च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते तहसीलदार राजेश लांडगे यांनी यावेळी प्रत्येक घटनेबाबत विस्तृत माहिती दिली, यावेळी पोलीस निरीक्षक विकास पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.प्रियांका टोंगे,नायब तहसीलदार रेखा चामनर, मंडळ अधिकारी महेश वाकळे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ, उत्तम बाबळे, रमेश गंगासागरे,एम.एम.टोणपे,किशोर राठोड, तलाठी खेडकर, यांच्यासह पत्रकार व कर्मचारी हजर होते.